उड्या मारून आंदोलन करणारे आमदार: मंत्रालयाच्या जाळीत अडकल्याने बचावले



मुंबई
- राजकारणात निर्णय घेताना आणि त्याला विरोध करताना काय काय करावं लागतं, याचं ताजं उदाहरण म्हणजे आदिवासी आमदारांनी मंत्रालयात दिलेला ‘उडी’चा धडा. अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाच्या विरोधात महायुतीचे आदिवासी आमदार चांगलेच आक्रमक झाले आणि आक्रमकतेची हद्द म्हणजे मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून थेट उडी मारण्याची !

उडी मारून संरक्षण जाळीत अडकलेले आमदार: काही झाले तरी शो मस्ट गो ऑन

विधानसभेचे उपाध्यक्ष आणि एनसीपीचे हिरवेगार आमदार नरहरी झिरवळ आणि त्यांच्यासोबत हिरामण खोसकर यांनी सरकारला धक्का देण्याचा चांगलाच प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या मजल्यावरून थेट उडी मारली, पण देवाचा आशीर्वाद आणि मंत्रालयाच्या जाळीने त्यांना सावरलं. जाळीवर पडून दोघेही बिनधास्त वाचले, पण त्यांची नाटकबाजी बरीच लोकांनी पाहिली.

"प्लॅन बी"ची धमकी आणि जाळीत अडकलेला प्लॅन



आमदार झिरवळ यांनी काही वेळापूर्वीच सरकारला इशारा दिला होता की, "आमच्याकडे प्लॅन बी आहे!" पण या प्लॅनमध्ये त्यांनी काय विचार केला होता, हे जाळीत अडकलेल्या अवस्थेतून कळले नाही. त्यांनी "आम्ही सुद्धा माणसं आहोत!" असं जाहीर करून सांगितलं, पण त्यांचे शरीर जाळीवर विसावल्यानंतरच हे सिद्ध झालं. उड्या मारून काही साध्य होत नाही, हे कळायला इतकं थरारक नाटक करावं लागतं, हेच आश्चर्य!

मुख्यमंत्री हसले की रडले?

आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ‘उड्या’ मारणाऱ्या आमदारांना पाहिलं की नाही, ते कळलं नाही, पण जाळीत अडकल्यामुळे सगळं मंत्रालय स्तब्ध झालं होतं. "आमदारांनी मंत्रालयात उड्या मारण्याची नवी पद्धत सुरु केलीय का?" असा प्रश्न काहींना पडला. शेवटी, मंत्रालयाच्या सुरक्षारक्षकांनी आमदारांना सुखरूप जाळीतून बाहेर काढलं आणि सगळं शांत झालं. आता प्रश्न आहे की, जाळीवरून पुढचं आंदोलन कसं होणार?



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने