धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्र प्रकरणावर चाटू पत्रकारांच्या चमचमीत प्रतिक्रिया!


धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्राच्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे, पण या प्रकरणामुळे साहेबांपेक्षा त्यांचे दोन "खास" पत्रकार मित्र अधिक अस्वस्थ दिसत आहेत. साहेबांच्या या दोन चमच्यांपैकी एक पापनगरीचा तर दुसरा स्वार्थी पत्रकार, ज्यांनी पत्रकार संघ बुडवला आणि आता साहेबाला बुडवायचा निर्धार केला आहे!

या दोघांनी मिळून पत्रकार भवनावर कब्जा जमवला आहे, एकजण इमारत सोडतोय तर दुसरा त्वरित झेंडा लावतोय. विशेष म्हणजे, यांची संपत्ती आणि पगाराचा ताळमेळ जर काढला तर "अर्थशास्त्रातील रहस्य" शोधायला लागतं! यांच्या पत्रकारितेचं ब्रीदवाक्य: "पैसा दो, बातमी लो!"

प्रकरणामध्ये स्वतःहून उडी घेतलेल्या या दोन पत्रकारांनी साहेब कसे बरोबर आहेत, हे सिद्ध करण्यासाठी कसलेही कसर सोडली नाही. महसूल अधिकार्यांना चांगलंच उचकवून यादवीबरोबर रेस्ट हाऊसमध्ये दारूच्या पार्ट्या रंगवल्या. अर्थात, त्यांच्या याच बातम्या म्हणजे हास्यास्पद ठरल्या आणि अन्य पत्रकारांनी त्याची  कुठेही प्रसिद्धी दिली नाही.

आता सुभेदार यांनी साहेबांना खुले आव्हान दिले आहे: डॉ. ओम्बासे यांनी त्यांच्या वडिलांची निवृत्ती तारीख आणि स्वतःची जन्मतारीख उघड करावी. तसेच, त्यांनी २०१४ साली यूपीएससी अर्जासोबत जोडलेलं नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र आणि त्यावेळच्या उत्पन्नाचे तपशील सार्वजनिक करावेत. सुभेदार यांचं म्हणणं आहे, की साहेबांनी २०११-१२, २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांतलं उत्पन्न जाहीर करून जिल्ह्यातील जनतेच्या शंका दूर कराव्यात.

साहेब आणि त्यांचे चमचे आता कुठल्या हॉटेलमध्ये चर्चा करणार, हे पाहायला धाराशिवची जनता उत्सुक आहे!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने