पुस्तकातील पन्नास पाने लिहिली तरी संपणार नाही अशी दिवाळीची 'पाकिट पॉलिसी'!"



गेवराई: पत्रकारितेचा इतिहास बाळशास्त्री जाभेकरांपासून सुरू झाला, तिथेच पत्रकारांना 'हुकुमशाहीला रोखण्याचं बळ' दिलं गेलं. मात्र, आता पत्रकारितेत एक नवाच प्रकार जन्माला आलाय - 'पाकिट पॉलिसी!' याचा थेट परिणाम असा की, दिवाळी अंकासाठी पत्रकारांकडून मागितलेल्या जाहिरातींच्या बदल्यात हजार पाचशे रुपयांची पिशवी मिळवून, काही "घुसखोर पत्रकार" या क्षेत्रात 'पावसाळ्यातल्या बिनपाण्याच्या गटारासारखं' वाहतायत.


एकेकाळी पत्रकारांनी लेखणीच्या जोरावर भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचा मुकाबला केला, पण आजची परिस्थिती अशी आहे की, जाहिरात मागायला गेलेल्या पत्रकारांवर हसण्याचे कार्यक्रम रंगतात. जाहीरातींऐवजी २००-३०० रुपयांची पाकीटं दिली जातात, आणि हे 'घुसखोर पत्रकार' ती पिशवीही आनंदाने उचलतात. शहरातील प्रत्येक कर्मचारी आणि नेता यांना वर्गणी देऊन मग हे 'पाकिटशाही'चे खेळ सुरू होतात.


शहरात काही पत्रकारांनी संघ बनवून त्याच्याच नावे पिशव्या मिळवणं हा एक मोठा व्यवसाय बनलाय. न कधी एकही बातमी लिहिलेली, नाचरणारी लेखणी आणि न शब्दांचा गंध असणारे लोक आज पत्रकार संघाच्या पदावर विराजमान आहेत. वाईट म्हणजे, दिवाळी पिशवी मिळवण्यासाठी त्यांच्या हातात काही पैसे जरी आले, तरी खरी पत्रकारिता मात्र आज त्यांना हात दाखवत दूर पळून जात आहे.


ग्रामीण भागातली स्थितीही फार वेगळी नाही. गावातील कर्मचारी वर्गणी करून वरिष्ठांकडे पाकीट पोहोचवतो, आणि पत्रकारांच्या नावावर त्यांना दोन नंबरच्या लोकांनी बिदागी दिलेली दिसते. पण, गंमत म्हणजे ज्या घुसखोरांनी ही व्यवस्था सुरू केली आहे, ते लोक दिवाळीच्या पिशव्या घेऊन 'चांगला हप्ता' घेऊन निघालेत.तर, यावेळी दिवाळी अंकाच्या जाहिरातींमध्ये पैसा खेळतो, आणि पत्रकारिता मात्र चुलीत जाते!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने