लाडकी बहिण योजनेबद्दल राऊतांचा खोटारडेपणा ! भोपाळ पोलिसांच्या नजरेत !!


भोपाळ: उबाठा गटाचे बडबड्या खासदार संजय राऊत यांनी मध्य प्रदेशातील 'लाडकी बहिण' योजना बंद पडल्याची अफवा पसरवली, आणि त्यामुळे त्यांच्याविरोधात भोपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राऊत यांनी दावा केला की, ही योजना संपूर्ण भारतात यशस्वी होत नाही आणि यामुळे सरकारचे दिवाळं निघणार आहे.


ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे, पण राऊतांना मात्र हा "राजकीय खेळ" वाटतो. तक्रारीनुसार, राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनता घाबरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांनी केला आहे.


राऊतांच्या मते, मध्य प्रदेशातील वित्त सचिवांनी या योजनेला "अवैध" ठरवलं आहे, आणि या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत पगार होणार नाही. त्यांचा दावा असा आहे की, कंत्राटदार आंदोलन करत आहेत आणि सरकारच्या 40 टक्के कमिशनचा रडका फंडा आहे.


यात राऊतांना मुद्दामहून राजकीय खेळ दिसत आहे, पण पोलिसांना मात्र त्यांचा खोटारडेपणा दिसून आला आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे मध्य प्रदेशच्या महिलांची आर्थिक सक्षमीकरणाची स्वप्नं आणखी एका खोट्या दाव्यामुळे मातीमोल झालीयत, असं पोलिसांचं मत आहे.


संजय राऊतांचे हे आरोप ऐकून काही लोकांनी विचारलं आहे, "संजयजी, काय तुमचं स्वतःचं पेट्रोलियम आहे का ज्यावर तुम्ही असे दावे करता?!"


आता भोपाळ पोलिसांच्या या कायदेशीर कारवाईमुळे राऊतांच्या 'बडबड' राजकारणाचं पुढे काय होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने