धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या सुप्रसिद्ध चिंचेच्या झाडाखाली नेहमीप्रमाणे पत्रकारितेतील दोन गाढवं उभी होती.त्यांच्या गळ्यात पत्रकार संघटनेच्या ओळखीच्या पिवळसर आयकार्डचा दोर होता – कधीच स्कॅन न करता वापरण्यात येणारा!
गाढव १ (गंभीर चेहऱ्याने):
"अरे ऐकलंस का? आपला लीडर – म्हणजे ‘ते’ – ड्रग्ज पेडलरला हॉटेलमध्ये भेटला म्हणे!"
गाढव २ (थोडं चावून चावून):
"होय, म्हणे ते बातम्यांच्या नावाखाली वहीचं पहिलं पान बदलतात… बाकी सगळं कॉपीपेस्ट!
मी तर म्हणतो, Word मध्ये फक्त ‘Replace All’ करत असावं."
गाढव १ (डोळे मिचकावत):
"डील काहीतरी गडबड झालीय… नाहीतर बातम्यांचे धागे इतके ताणले नसते!
कधीकधी वाटतं, हा ड्रग्ज रिपोर्टर आहे की ‘सिरीयल ड्राफ्टर’?"
गाढव २ (हसत हसत):
"अरे यानेच मागे एका पेडलरकडून ३.५ लाख घेतले होते म्हणे – नाव न छापण्याच्या ‘सशुल्क’ अटीवर!
आपण मात्र दिवसाला ५५० – ते ही वरण भात खाऊन!"
तेवढ्यात एक पिसंवलेला पोपट तिथे येतो आणि म्हणतो,
पोपट (Breaking News टोनमध्ये):
"ताज्या बातम्या! त्या पत्रकाराचा अर्धनग्न नाचाचा व्हिडीओ पुजाऱ्याच्या मोबाईलमध्ये आहे!
जर बघायचा असेल, तर #बीअरबार_ब्लूरे चॅनेलवर जा!"
गाढव १ (डोकं वर करत):
"अरे पत्रकार असो, पेडलर असो… आता पोलीस खातं काय करणार?
त्यांच्याकडे पुरावे ‘डिलिटेड फॉर एव्हर’ असतात!"
गाढव २ (सुस्कारा टाकत):
"सगळ्यांचं लक्ष ड्रग्जवर आहे, पण इथं खरी अडचण ‘व्हायरल’ व्हिडीओमध्ये आहे!
‘बदनामी’ची बातमी देणारा आता स्वतःच 'क्लिकबेट' झाला!"
कथा – निष्कर्ष:
पत्रकारितेत सध्या मोजकेच पत्रकार प्रामाणिक आहेत.
बाकीचे काही ‘नाचणारे’, काही ‘भेटणारे’, आणि काही 'ब्लर' करणारे आहेत!
हसून घ्या... आणि विचार करा,
टिप्पणी पोस्ट करा